काशी, अयोध्या, वृंदावन, प्रयागराज आणि संपूर्ण भारतभर धार्मिक आणि आध्यात्मिक यात्रा अनुभवण्याची संधी! अनुभवी मार्गदर्शकांसह सुरक्षित आणि आनंददायक यात्रा बुक करा.
माऊली प्रतिष्ठान मध्यमवर्गीय लोकांना धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सेवांद्वारे एक नवीन दिशा देण्याच्या हेतूने तीर्थयात्रांचे आयोजन करते. आमच्या प्रवासाची कहाणी भावनिक आणि प्रेरणादायी आहे. दोन यशस्वी यात्रांनी आमचा आरंभ झाला ; वृंदावन, काशी, अयोध्या, चित्रकूट व अयोध्येतील इतर अनेक यात्रांचे आयोजन करण्यात आले.
या यात्रांचे आयोजन भागवताचार्य श्री पवनजी महाराज चमगाव ( आळंदी ), व आशिर्वाद सुशिला धनराज पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी केले गेले आहे. त्यांच्या समर्पित सेवेने अनेक लोकांच्या जीवनात नवीन आशा, आनंद व एक नवीन आरंभ निर्माण होईल,
आमचा ध्यास आहे की प्रत्येक यात्रेद्वारे लोकांना केवळ धार्मिक विधींपेक्षा अधिक आत्मिक उन्नती, मनःशांती व एकजुटीचा अनुभव प्राप्त व्हावा. हीच आमची प्रेरणा व आमचे ध्येय आहे.
Khup Chan Ani Bhaktimay Vatavarnat Jhaleli Yatra.